प्रार्थना आणि नामजप केल्यावर पाऊस थांबून पुराचे पाणी ओसरणे

१. भगवान श्रीकृष्ण आणि शिव यांच्या चरणी प्रार्थना केल्यावर पाऊस थांबणे अन् पुराचे पाणी ओसरणे

सौ. कविता उसरेठा

‘आम्ही कर्मामाई मंदिरात २ मास पोथीवाचन करत होतो. महापुराच्या दिवशी पोथी वाचत असतांना पोथीतही प्रलयाचा प्रसंग होता. वाचन झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि शिव यांच्या चरणी प्रार्थना केली, ‘हे देवतांनो, आता हा प्रलय थांबवा ! हे भगवंता, सामान्य जनांची पुष्कळ हानी होत आहे’, ही प्रार्थना करतांना डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. २० मिनिटांत पाऊस थांबला आणि जिल्हाधिकारीही आले. महापुराचे पाणी ओसरायला लागले आणि देवतांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

२. नामजप केल्यावर पाऊस थांबून पूर ओसरणे

त्यानंतर सौ. कीर्तीताईने (सौ. कीर्ती महेश जाजडा यांनी) ‘ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदं प्रमाणं । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।’ हा नामजप करायला सांगितला. मी तो नामजप मंडळातील सर्व महिलांना लिहून दिला आणि ‘१ घंटा हा नामजप करूया’, असे सांगितले. आम्ही सर्वांनी तो नामजप १ घंटा केला. त्यानंतर देवाच्या कृपेने पाऊस थांबला आणि पूरही ओसरला. तेव्हा देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– सौ. कविता राजकुमार उसरेठा (धर्मप्रेमी), दिग्रस, यवतमाळ. (२२.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक