‘११.१२.२०१९ या दिवशी मी सकाळी नामजप करण्यापूर्वी प्रार्थना करण्यासाठी हात जोडले. तेव्हा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून दर्शन झाले. माझे लक्ष त्यांच्या मधुर हास्याकडे गेले आणि माझे मन निर्विचार झाले. ‘प.पू. गुरुदेव कृष्णच आहेत’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली आणि पुढील ओळी सुचल्या.
श्रीकृष्णा,
आम्ही तुला ओळखलेच नाही रे ।
तू ना मोरपिसांचा मुकुट धारण केलास ।। १ ।।
ना पितांबर परिधान केलास ।
ना सोन्या-मोत्यांची आभूषणे घातलीस ।। २ ।।
ना हातात तुझी प्रिय बासरी धरलीस ।
ना तुझा रंग सावळा ।। ३ ।।
ना भाळी गंध केशरी ।
कसे ओळखणार आम्ही तुला ।। ४ ।।
पण या वेळीही जिंकलो आम्ही ।
आणि तूच हरलास बरं का ।। ५ ।।
जरी तू आभूषणे लपवली ।
आणि बासरीही नाही घेतली ।। ६ ।।
जरी सावळा रंग त्यागून गौरगुलाबी रंग घेतलास ।
तू तुझे मधुर हास्य नाही लपवू शकलास ।। ७ ।।
तुझ्या त्या मधुर अन् वेड लावणार्या हास्याने ।।
सारे गुपित उलगडले ।। ८ ।।
गुरुरूपातील हे श्रीकृष्णा ।
आम्ही तुला ओळखले ।। ९ ।।
तूच आम्हाला जिंकले,
मधुर हास्याने आम्हाला हरवले (टीप १) ।
अगदी तेव्हाही (टीप २) आणि आताही (टीप ३)।। १० ।।
टीप १ – देहभान हरपले.
टीप २ – द्वापरयुगात, टीप ३ – कलियुगात’
– कु. अनिता कल्लाप्पा लोळसुरे, निपाणी, कर्नाटक. (वर्ष २०२२)