‘फेब्रुवारीमध्ये २०२३ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एक शिबिर झाले. त्या वेळी मला रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली. रामनाथी आश्रमात आल्यावर मला चैतन्य आणि सकारात्मकता जाणवली. मला आश्रमात कसलाही त्रास झाला नाही किंवा भीती वाटली नाही, तसेच कसलीही अडचण जाणवली नाही.
‘गुरुदेवा, मला हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याची पुष्कळ आवड आहे आणि ते कार्य करण्याची इच्छा आहे; म्हणून मी त्या दृष्टीने व्यष्टी आणि समष्टी स्तरावर नक्कीच प्रयत्न करणार आहे, तसेच मी माझ्या घरी आश्रमासारखे चैतन्यदायी वातावरण आणण्याचा प्रयत्न करणार आहे.’
– श्री. शंतनु शंकर एकडे, नांदुरा, बुलढाणा. (२४.३.२०२३)