बुलढाणा येथील श्री. शंतनु शंकर एकडे यांना साधनेला आरंभ केल्यावर स्वतःत जाणवलेला पालट आणि आलेली अनुभूती !

१. साधनेला आरंभ केल्यावर राग न्यून होणे आणि देवाच्या अस्तित्वाची प्रचीती येणे

श्री. शंतनु एकडे

‘वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीच्या कालावधीत मी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडलो गेलो. जेव्हा मी साधना करण्यास आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाला जाण्यास आरंभ केला, तेव्हा माझी होणारी चिडचिड अन् राग न्यून होऊन मी शांत झालो. मला देवाच्या अस्तित्वाची प्रचीती येऊ लागली.

२. देवाने आगीपासून रक्षण केल्याची अनुभूती येणे

माझ्या घरी ‘गॅस सिलिंडर’ने पेट घेतला होता. तेव्हा मी समोरच उभा होतो, तरीही मला काही झाले नाही. त्या वेळी देवघरातील वस्त्र जळले आणि ‘देवाने ते संकट स्वतःवर घेतले’, असे माझ्या लक्षात आले.’

– श्री. शंतनु शंकर एकडे, नांदुरा, बुलढाणा. (२४.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक