सच्चिदानंद परब्रह्म माझी गुरुमाऊली (टीप १) ।
आहे तिची कृपा माझ्यावरी ।। १ ।।
तिची किती कृतज्ञता व्यक्त करू ।
शब्द माझे अपुरे पडती ।। २ ।।
माझा प्रत्येक श्वास तिच्या इच्छेने चाले ।
माझे अनेक जन्मांचे प्रारब्ध तिने अल्प केले ।। ३ ।।
मला मनुष्यजन्म तिच्या इच्छेने मिळाला ।
करूनी घेते ती माझ्याकडून साधना ।। ४ ।।
अशी आहे माझी सर्वश्रेष्ठ गुरुमाऊली ।।
जाते मी संपूर्णपणे तिच्या चरणी ।। ५ ।।
आता एकच इच्छा आहे गुरुमाऊली ।।
तुझ्या चरणांशी मला एकरूप करून घे आई ।
हीच प्रार्थना तुझ्या चरणी ।। ६ ।।
टीप १ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले.
– सुश्री (कु.) सविता जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.८.२०२२)