इंदूर (मध्यप्रदेश) येथे भाजपच्या मिरवणुकीवर मुसलमान कुटुंबाने टाकले उकळते पाणी !

इंदूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशमध्ये भाजपला विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. इंदूर येथे अशीच मिरवणूक काढण्यात येत असतांना घराच्या छतावरून उकळते पाणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर फेकल्याची घटना ४ डिसेंबरला घडली. या प्रकरणी पोलिसांनी पठाण, त्यांची पत्नी शबनम, तसेच त्यांची दोन मुले शेरू आणि शकील यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

संपादकीय भूमिका

भाजपला मुसलमानांची मते मिळत नाहीत आणि मुसलमान अशा प्रकारे विरोधही करतात, हे लक्षात घ्या !