Disrespect Of Hindus Sentiments : रूमडामळ (गोवा) येथे गोमांसाचे उघड्यावर होणारे प्रदर्शन आणि विक्री याला आळा घाला !

नागरिकांची ग्रामसभेत मागणी

उघड्यावर गोमांसाचे प्रदर्शन करणे, हे बहुसंख्य हिंदु समाजाच्या गोमातेप्रती असलेल्या भावनांचा अनादर करणारे असल्याचा पंचसदस्य विनायक वळवईकर यांचे मत

मुबेना फणीबंद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत नागरिकांची मागणी

मडगाव, ५ डिसेंबर (वार्ता.) : रूमडामळ येथे उघड्यावर गोमांसाचे प्रदर्शन करून त्याची विक्री करू नये, अशी मागणी काही स्थानिकांनी रूमडामळ पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत केली. रूमडामळ पंचायतीचे पंचसदस्य विनायक वळवईकर म्हणाले, ‘‘एखादा समाज गोमांसाचे सेवन करत असेल, तर त्याविरोधात आम्ही नाही; मात्र पंचायतीने उघड्यावर गोमांसाचे प्रदर्शन करायला देऊ नये, अशी आमची मागणी आहे. उघड्यावर गोमासांचे प्रदर्शन करणे हे बहुसंख्य हिंदु समाजाच्या गोमातेप्रती असलेल्या भावनांच्या विरोधात आहे.’’ मुबेना फणीबंद यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली.

रुमडामळ पंचायतीचे पंचसदस्य विनायक वळवईकर

ग्रामसभेत स्थानिक नागरिक भगवान रेडकर आणि इतर काही जण म्हणाले, ‘‘जिल्हाधिकार्‍यांचा ‘उघड्यावर गोमासांची विक्री करू नये’, असा आदेश आहे. हा आदेश धाब्यावर बसवून रूमडामळ येथे उघड्यावर गोमांसाचे प्रदर्शन करून त्याची विक्री केली जाते.’’ हा प्रश्‍न सोडवण्यासाठी नागरिकांनी पंचायतीला १ मासाचा अवधी दिला आहे.