चेन्नई (तमिळनाडू) – बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ या चक्रीवादळामुळे पालटलेल्या हवामानाचा तमिळनाडूची राजधानी चेन्नईसह काही जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या भागात मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. ‘मिचाँग’ या चक्रीवादळामुळे चेन्नईसह, कांचीपुरम्, चेंगालपेट, तिरुवल्लूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टी होत आहे.
सौजन्य टाइम्स नाऊ
‘मिचाँग’ चक्रीवादळाची आंध्रप्रदेशलाही धडक !
बंगालच्या उपसागरात उद्भवलेल्या ‘मिचाँग’ चक्रीवादळाने आंध्रप्रदेशालाही धडक दिली आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्याात अतीदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. राज्य सरकारने तिरुपती, नेल्लोर, प्रकाशम्, बापटला, कृष्णा, पश्चिम गोदावरी आणि काकीनाडा जिल्ह्यांत ‘रेड अॅलर्ट’ जारी केला आहे.