फर्ग्युसन रस्त्यावरील विनापरवाना मॉलचे बांधकाम पाडले !

फर्ग्युसन रस्त्यावरील बांधकाम विकास विभागाने पाडलेले विनापरवाना शॉपिंग मॉल

पुणे – बांधकाम विकास विभागाने शिरोळे प्लॉट येथील फर्ग्युसन रस्त्यावरील विनापरवाना शॉपिंग मॉलवर कारवाई केली आहे. लोखंडी अँगल, गर्डर, पत्रे इत्यादींच्या साहाय्याने २ मजली विनापरवाना मॉल सिद्ध करण्यात आला होता. या कारवाईत अनुमाने ७ सहस्र चौरस फूट बांधकाम पाडले आहे. यामध्ये छोटी-मोठी मिळून ७० स्टॉलवजा दुकाने चालू होती. या कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिली होती, त्यामुळे कारवाई करता येत नव्हती; परंतु प्रशासनाने ८ वर्षे चालेली स्थगिती उठवून ही कारवाई केली. या ठिकाणी मॉल झाला असता, तर नागरिकांना पुढे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार होते.