उत्साहाने सेवा करणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील कु. किरण व्हटकर !

कु. किरण व्हटकर

१. आश्रमात येणार्‍या पाहुण्यांचे उत्साहाने स्वागत करणे आणि रात्री विलंबाने आश्रमात येणार्‍या पाहुण्यांना ‘गरम जेवण मिळावे’, यासाठी प्रयत्न करणे : ‘कु. किरण रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येणार्‍या पाहुण्यांच्या महाप्रसादाचे नियोजन पहाते. आश्रमात प्रतिदिन विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे पाहुणे येतात. किरण प्रत्येक वेळी भावाच्या स्तरावर वेगवेगळे प्रयत्न करत त्यांच्या स्वागतासाठी उत्साहाने पुढे असते.

एकदा काही पाहुणे रात्री उशिरा आश्रमात येणार होते. त्या वेळी आश्रमातील सर्व साधक झोपायला गेले होते. मी पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्यावर मला दिसले, ‘किरण सेवा करत आहे.’ तेव्हा मी तिला विचारले, ‘‘एवढ्या रात्री काय करतेस ?’’ त्या वेळी ती उत्साहाने मला म्हणाली, ‘‘पाहुणे येणार आहेत. त्यांना गरम महाप्रसाद मिळायला हवा. त्या दृष्टीने मी आणखी काय करू शकते ?’, असा विचार करत होते.’’ दिवसभर सेवा करूनही त्या वेळी ती उत्साही दिसत होती.

कु. गुलाबी धुरी

२. शिकण्याची वृत्ती : एकदा मी किरणला सांगितले, ‘‘आज दिवसभरात आपल्याला शिकायला मिळालेली सूत्रे लिहूया.’’  तेव्हा तिने शिकायला मिळालेली अनेक सूत्रे लिहिली. त्यातील काही सूत्रे पुढे दिली आहेत.

२ अ. निर्जीव वस्तूंकडून शिकणे

२ अ १. स्वीकारण्याची वृत्ती : काही वेळा आपल्या हातून भांडी चुकून सुटून खाली पडतात, तरीही ती भांडी आपल्याला रागावत नाहीत. आपण सांगतो, ती सेवा ती भांडी करतात.

२ अ २. एकाग्रता साधणे : ध्यानमंदिरात देवाच्या समोर साधकांना बसण्यासाठी आसंद्या ठेवलेल्या असतात. कोणी त्या आसंद्या हालवून बाजूला केल्या, तरीही त्यांचे ध्यान सुटत नाही.

३. अंतर्मुखता : एकदा किरण एका संतांच्या सेवेत होती. त्या वेळी तिच्याकडून एक गंभीर चूक झाली. संतांनी तिला चूक सांगितल्यानंतर तिने निराश न होता अंतर्मुख होऊन ‘स्वतःकडून काय चुकले ?’, याचे चिंतन केले. नंतर तिने मला सांगितले, ‘‘संतांनी चूक सांगितल्यामुळे माझी अंतर्मुखता वाढली आणि मला उपाययोजना काढण्यासाठी दिशा मिळाली.’’

– कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०२२)