१. देवाप्रती कृतज्ञता वाटणे
‘मे २०२१ मध्ये मला कोरोना झाल्यामुळे माझे नाट्यवर्ग घेण्याचे रहित झाले. आजारातून बरे झाल्यावर सप्टेंबर २०२२ पासून मी नाट्यवर्ग घेण्यास पुनश्च प्रारंभ केला. कोरोनाच्या गंभीर स्थितीतून बरे होणे, म्हणजे ‘माझी राहिलेली नाट्याची सेवा पूर्ण करायला देवाने दिलेले जीवनदानच आहे’, असे मला वाटते.
२. नाट्यवर्ग घेण्याचे श्रेय परात्पर गुरु डॉक्टरांना देणे
१२.९.२०२२ या दिवशी वर्गाला आरंभ करतांना मी प्रार्थना केली, ‘मला काही येत नाही. केवळ गुरुदेवांच्या कृपेने मी हा नाट्यवर्ग घेत आहे.’ हा पहिलाच नाट्यवर्ग संपूर्ण भावाच्या स्तरावर झाला. साधकांना शिकवत असतांना माझी अनेकदा भावजागृती होऊन कंठ दाटून येत होता. वर्गात असे वारंवार होत होते.
३. दीड घंटा बोलूनही दमल्यासारखे न होणे
माझा पहिला नाट्यवर्ग दीड घंट्याचा झाला. (मी नुकताच कोरोनाच्या गंभीर स्थितीतून बाहेर आलो होतो.) त्यामुळे ‘बोलणे अन् विषय समजावून सांगणे’ करतांना माझ्या फुप्फुसांवर ताण येतो; परंतु त्या वेळी मला फुप्फुसावर जराही ताण जाणवला नाही किंवा दमल्यासारखेही वाटले नाही. प्रारंभी ‘मला जमेल कि नाही’ असे वाटत होते; परंतु ईश्वराची इच्छा आणि चैतन्य कसे कार्यरत असते, हे आम्हाला अनुभवायला मिळाले.’
– श्री. रामचंद्र शेळके, फोंडा, गोवा. (७.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |