सर्व जगाचे जहाज केले असता ते गच्च भरून जाईल इतके सोने आणि इतकी रत्ने हे आर्यमाते तू शेकडो भुयारांतून आमच्यासाठी जतन करून ठेवली आहेस. त्यावाचून कोहिनूरांनी भरलेली पेटी गोवळकोंड्याकडे आहे ती वेगळीच ! अपरिमित सुवर्णांनी सुशोभित असलेल्या सुवर्णभूला आणि अनंत कोहिनूरांनी तेजोमय झालेल्या आर्य वसुंधरेला आमची प्रणति असो !
(साभार : तेजस्वी तारे, वंदे मातरम् समग्र सावरकर, खंड चौथा)
संकलन : श्री. दुर्गेश जयवंत परुळकर