इतबा अल् ‘हिंदु’ ?

गेल्या मासात ७ ऑक्टोबरला २ सहस्रांहून अधिक जिहादी आतंकवाद्यांनी १ सहस्र २०० हून अधिक निष्पाप इस्रायली नागरिकांचा नरसंहार केला. ‘इतबा अल् यहुदी’ म्हणजेच ‘ज्यूंचा नरसंहार’ या घोषवाक्याने जणू हमासला त्याच्या क्रौर्यास राक्षसी रूप धारण करण्यास साहाय्य केले. गेल्या वर्षी अशीच एक घोषणा अन् त्याद्वारे भारतभरात झालेली हिंसा सर्वांच्या स्मरणात आहे. ‘गुस्ताक ए नबी की सजा सर तन से जुदा’ म्हणजेच ‘अल्लाचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद करू’ ! याच क्रूर विचारसरणीतून केवळ सरकारी मालमत्तेची नासधूसच नाही, तर अनेक शिरच्छेद झाले. ही तुलना करणे आवश्यक यासाठी की, भारत असो कि इस्रायल ही दोन्ही राष्ट्रे नि संस्कृती यांना एका धाग्यात गुंफणारा त्यांचा धर्म आहे आणि त्या धर्माला मारक ठरणार्‍या आजच्या परिस्थितीचा उदय हा ‘दार्-उल्-इस्लाम’ या समान विचारसरणीतून झाला आहे !

वरील दोन प्रसंगांचा विचार करता दोन्ही देशांतील कलाकारजगत याकडे कसे पहाते ?, हेही पहाणे आवश्यक ठरते. इस्रायली नागरिकांत ओतप्रोत भरलेली राष्ट्रनिष्ठा त्यांना जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरी इस्रायलसाठी काहीही करण्यासाठी प्रेरित करते. त्याचे उत्तम उदाहरण लिओर राज हा ज्यू कलाकार ! इस्रायली भूमी तिच्या बाळांना बोलावत होती, तेव्हा ते स्वत: युद्धात सहभागी होण्यासाठी इस्रायली सैन्यात भरती झाले. दुसरे उदाहरण अमेरिकेत रहाणार्‍या ज्यू कलाकार नोआ तिश्बी यांचे होय! त्या इस्रायलवर होत असलेल्या अत्याचारांचा जगासमोर पाढा वाचून दाखवत आहेत. त्यांची ‘साडेतीन सहस्र वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या इस्रायलची भूमिका शंभर टक्के कशी योग्य आहे’ आणि ‘इस्रायल हमासला नष्ट करून इतिहास प्रस्थापित करेल’ आदी वक्तव्ये ऐकल्यास राष्ट्रप्रेम अन् विजिगीषू वृत्ती काय असते, याचा ठायीठायी प्रत्यय येईल. याउलट भारतातील उपटसुंभ कलाकारांना पहा. यांच्याही जिवावर बेतलेल्या जिहादी आतंकवादाच्या विरोधात यांच्या तोंडातून चकार शब्दही फुटत नाही ! सनातन धर्माच्या विरोधात यांची ‘वोक संस्कृती (विकृती)’ कामाला येते. काश्मिरी हिंदूंवरील नरसंहारावर काढलेला चित्रपट यांना ‘प्रपोगंडा चित्रपट’ वाटतो आणि काश्मिरी दगडफेक आतंकवाद्यांवर झालेली सैनिकी कारवाई यांच्यासाठी अन्याय्यी असते ! अशांचा भरणा असलेल्या भारतीय ‘इलीट क्लास’ने इस्रायलच्या परिस्थितीतून आतातरी बोध घेतला पाहिजे ! इस्रायलच्या दारातून संकट थेट आत घुसले आहे. भारतातही धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांमुळे ते आपल्या भारतभूमीला छिन्नविछिन्न करण्यास आतुर झाले आहे. आपण हे लक्षात घेतले नाही, तर ‘इतबा अल् हिंदु’ व्हायलाही वेळ लागणार नाही !

– एक प्रखर हिंदु त्वनिष्ठ, गोवा