१० लाख रुपयांची खंडणी घेणार्‍या महिला कृषी साहाय्यकाचे निलंबन !

नाशिक येथील प्रकार !

प्रतिकात्मक चित्र

नाशिक – आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देणार्‍या कृषी साहाय्यक संशयित सारिका बापूराव सोनवणे (वय ४२ वर्षे) यांना निलंबित केले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. सारिका यांनी दिंडोरी येथील स्वामी समर्थ आध्यात्मिक पिठाचे विश्वस्त यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे घेतांना सारिका सोनवणे यांच्यासह त्यांचा मुलगा मोहित बापूराव सोनवणे (वय २५ वर्षे) यांना पोलिसांनी रंगेहात पकडले.

स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळातील कार्यकारी सदस्य निंबा मोतीराम शिरसाट (वय ५४ वर्षे) यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्यावरून ‘ब्लॅकमेल’ केले जात होते. याच अनुषंगाने त्यांच्याकडे खंडणी मागितली होती.

निलंबित सारिका सोनवणे यांच्यासह त्यांचा भाऊ विनोद चव्हाण, मुलगा मोहित यांना न्यायालयात उपस्थित केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका :

आता महिलाही गुन्हेगारीत पुढे ! हे महाराष्ट्राला लज्जास्पद !