कोरोनासारख्या नव्या महामारीचा पुन्हा एकदा चीनमध्ये प्रारंभ !

जागतिक आरोग्य संघटनेकडून सतर्कतेची चेतावणी

बीजिंग (चीन) – कोरोनासारख्या महामारीचा धोका पुन्हा एकदा निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या महामारीचा प्रारंभही कोरोनाप्रमाणे चीनमधून झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याची नोंद घेत जगभरात सतर्कतेची चेतावणी दिली आहे. या महामारीचा धोका वाढत असल्याने चीनमध्ये शाळा बंद करण्याची सिद्धता करण्यात येत आहे.

सौजन्य आज तक 

१. या महामारीचा संसर्ग प्रामुख्याने लहान मुलांमध्ये होत आहे. या रोगाची लक्षणे निमोनियासारखी आहेत; मात्र काही लक्षणे निमोनियापेक्षा भिन्न असल्याने याचे अद्याप निदान झालेले नाही. या रोगाची लागण झालेल्या लहान मुलांच्या फुफ्फुसांना सूज येते. यासह त्यांना ताप आणि खोकला येऊन श्‍वास घेण्यास त्रास होतो.

२. जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात अधिक माहिती देण्याची मागणी चीनकडे केली आहे. या रोगाने संक्रमित झालेल्यांवर योग्य देखरेख ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत.