या दिवशी घरात आणि मंदिरात दिव्यांची रोषणाई केली जाते. मंदिरातील दीपमाळा, कोनाडे तेलाचे दिवे लावून उजळवले जातात. रात्री १२ वाजता त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवांना त्रास देणार्या त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला. त्यामुळे आनंदित होऊन देवांनी दीपोत्सव साजरा केला. या दिवशी दीपदानाला अत्यंत महत्त्व आहे. दानवी शक्तीचा नाश करून सद्विचार आणि सदाचाराने जगावे, हाच संदेश त्रिपुरारि पौर्णिमेच्या उत्सवातून दिला जातो.
– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली (साभार : ‘आदिमाता दीपावली विशेषांक’)