कोलकाता – ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष मुकेश अंबानी बंगालमधील कालीघाट मंदिराला त्याचे प्राचीन वैभव मिळवून देणार आहेत. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची योजना घोषित केली आहे. मुकेश अंबानी यांनी २१ नोव्हेंबर २०२३ या दिवशी कोलकाता येथे आयोजित ‘बंगाल ग्लोबल बिझनेस समिट’ला संबोधित करतांना ही घोषणा केली.
Reliance Foundation deeply committed to participate in the resurgence of a glorious Bengal: Mukesh D Ambani, Chairman & Managing Director, Reliance Industries Limited pic.twitter.com/xtuxAoozNs
— Reliance Industries Limited (@RIL_Updates) November 21, 2023
अंबानी पुढे म्हणाले की, कोलकाता येथील कालीघाट मंदिराच्या जीर्णोद्धाराचे आणि नूतनीकरणाचे दायित्व ‘रिलायन्स फाऊंडेशन’ घेणार आहे. ‘रिलायन्स फाऊंडेशन’ बंगालचे प्राचीन वैभव परत आणण्यासाठी भागीदार होण्यासाठी कटीबद्ध आहे. हा प्रकल्प त्यांना आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. बंगाल हे ‘रिलायन्स’साठी सर्वांत मोठे गुंतवणुकीचे ठिकाण असल्याचेही अंबानी यांनी सांगितले.