हिंदूंनो, अशी वेळ तुमच्‍यावरही येऊ शकते, यासाठी काळजी घ्‍या !

१. धर्मांधांकडून साईबाबांचे छायाचित्र आणि ५ रुपयांची नाणी देऊन केलेले वशीकरण

‘माझा भाऊ वकील असून तो साधना करत नाही. ३.२.२०२२ या दिवशी तो न्‍यायालयात गेला होता. न्‍यायालयातून बाहेर पडत असतांना त्‍याला दोन फकीर भेटले. त्‍याने त्‍या फकिरांना पैसे दिले. त्‍यांनी भावाच्‍या डोक्‍याला मोरपीस लावले आणि त्‍याला साईबाबांचे छायाचित्र अन् ५ रुपयांची नाणी दिली. ते त्‍याला म्‍हणाले, ‘‘हे छायाचित्र आणि नाणी तुझ्‍याकडेच ठेव.’’ ते निघून गेल्‍यावर माझ्‍या भावाचे डोके दुखायला लागले. घरी येण्‍यापूर्वी भावाने ती नाणी आणि छायाचित्र एका देवळात दिले.

२. भावाची कापराने दृष्‍ट काढल्‍यावर त्‍याची डोकेदुखी न्‍यून होणे, भावाची दृष्‍ट साधिकेने काढल्‍यावर तिलाही डोकेदुखीचा त्रास होणे आणि तिने स्‍वतःची मानस दृष्‍ट काढल्‍यावर डोकेदुखी न्‍यून होणे

मी भावाची कापराने दृष्‍ट काढली. मग मी त्‍याला अंघोळ करायला सांगितली. तेव्‍हा त्‍याला लगेच बरे वाटले. सकाळपासून होणारी त्‍याची डोकेदुखी न्‍यून झाली; परंतु मी त्‍याची दृष्‍ट काढल्‍याने माझे डोके दुखायला लागले आणि मला अस्‍वस्‍थता जाणवू लागली. ‘दृष्‍ट काढल्‍याचे हे लक्षण आहे’, असे माझ्‍या लक्षात आले. त्‍यामुळे मी स्‍वतःच स्‍वतःची मानस दृष्‍ट काढली. त्‍यानंतर माझे डोके दुखायचे न्‍यून झाले.

 ३. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या घेत असलेला भक्‍तीसत्‍संग ऐकल्‍याने त्रास पूर्णपणे न्‍यून होणे आणि गुरुकृपेने या त्रासातून बाहेर पडता येणे

गुरुवार असल्‍याने रात्रीच्‍या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेला भक्‍तीसत्‍संग होता. तो ऐकतांना ‘काही त्रास असेल, तर तो न्‍यून होऊ दे’, अशी मी प्रार्थना केली. त्‍यामुळे मला होणारा त्रास एक घंट्यातच पूर्णपणे न्‍यून झाला. ही आमच्‍यावर परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा होती; म्‍हणून उपाययोजना काढून आम्‍ही त्‍या त्रासातून बाहेर पडलो. गुरुदेवांनीच माझ्‍या भावाला ती नाणी आणि छायाचित्र बाहेरच अर्पण करून घरी येण्‍याची सुबुद्धी दिली, नाहीतर अनर्थ झाला असता. भावाने ते सर्व घरी आणले असते, तर घरात सर्वांना त्रास झाला असता. ‘तो त्रास कोणत्‍या कारणाने होत आहे ?’, हेही आमच्‍या लक्षात आले नसते.

४. आपला हिंदु धर्म वाचवण्‍यासाठी आपण प्रत्‍येकाने प्रयत्न केले पाहिजे !

‘प्रत्‍येक घरात आपल्‍या कुटुंबाच्‍या समवेत काय घडते ?’, हे घरातील प्रमुखाला ठाऊक असायला हवे. घरातील व्‍यक्‍तींनीही अशा घटना कुटुंबप्रमुखाला सांगायला हव्‍यात. यातूनच आपण लगेच उपाययोजना करून अशा प्रसंगांतून लगेच बाहेर पडू शकतो. अशा गोष्‍टींमुळे ‘लोक कसे जाळ्‍यात अडकतात आणि चुकीच्‍या गोष्‍टी करतात’, हे आपल्‍याला शिकायला मिळते. ते लोक अशाच प्रकारे वशीकरण करत असतील. त्‍यातून ‘आपली लोकसंख्‍या अल्‍प करून हिंदु धर्म संपुष्‍टात आणण्‍याचे काम ते लोक करत आहेत. त्‍यामुळे प्रत्‍येकाने साधना करणे आणि अशा लोकांपासून सावध रहाणे आवश्‍यक आहे. आपला हिंदु धर्म वाचवण्‍यासाठी आपण प्रत्‍येकाने प्रयत्न केले पाहिजे. ‘आपण कळत नकळत कसे अडकतो ?’, हे आपल्‍याला समजतही नाही. त्‍यामुळे ‘देवाचे नाव मुखात असणे किती महत्त्वाचे आहे !’ हे आपल्‍या लक्षात येते.

यावरून आपल्‍या एक लक्षात येते की, ‘आपण सतर्क असायला हवे ! केवळ आपणच नाही, तर सर्व हिंदु बांधवांनी सतर्क असायला हवे !’ प्रत्‍येकाच्‍या कुटुंबात असे होत असेल आणि त्‍यांना होणारा त्रास त्‍यांच्‍या लक्षातही येत नसेल. आमच्‍यावर गुरूंची (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा असल्‍याने ते आमच्‍या लक्षात आले आणि आम्‍ही त्‍या कृपेमुळेच वाचलो. त्‍यासाठी आम्‍ही सर्व जण गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– कु. आरती सुतार, म्‍हापसा, गोवा. (६.२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक