विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळी मैदानात घुसला पॅलेस्टिनी समर्थक !

पोलिसांनी घेतला कह्यात : मुसलमान अधिवक्ता पुरवणार कायदेशीर साहाय्य !

कर्णावती (गुजरात) –  येथील नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या क्रिकेट विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्याच्या वेळी एक माणूस मैदानात घुसला. तो पॅलेस्टाईन समर्थक आणि ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. भारतीय डावाच्या १४ व्या षटकात मैदानात घुसून त्याने विराट कोहली यांना स्पर्श करून त्यांच्याशी बोलू लागला. सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्याला कह्यात घेतले. भारतातील कथित पुरोगामी आणि मुसलमान कट्टरवादी त्याचे गुणगान गात आहेत. भारतीय मुसलमान अधिवक्त्यांनी त्याला कायदेशीर साहाय्य देण्याची सिद्धता दर्शवली आहे. (ही आहे केवळ जन्माने भारतीय असलेल्यांची मानसिकता ! प्रेक्षकांनी भरगच्च भरलेल्या मैदानात नियम तोडून अवैधरित्या मैदानात घुसलेल्या एका विदेशी पॅलेस्टाईन समर्थकाची बाजू घेणे, म्हणजे भारतीय कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर नसणे,असा चुकीचा पायंडा पाडणार्‍यांवरही सरकारने कठोर कारवाई करावी, असेच सर्वसामान्य भारतियांना वाटते ! – संपादक)

सौजन्य रिपब्लिक वर्ल्ड

या तरुणाचे नाव वेन जॉन्सन असे असून त्याने भारतीय संघाचा पोशाख परिधान करून मैदानात प्रवेश केला होता. पॅलेस्टाईनच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी त्याला या संधीचा उपयोग करून घ्यायचा होता, असे त्याने पत्रकारांना सांगितले. (यातून धर्मांधांचा कट्टरवाद लक्षात येतो ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

‘कडेकोट’ पोलीस बंदोबस्त असतांनाही अशी घुसखोरी होणे पोलिसांना लज्जास्पद ! यात पोलिसांचाही सहभाग आहे का ?, याची चौकशी झाली पाहिजे !