कोल्हापूर – क्रूरकर्मा धर्मांध टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर, सांगली शहर, तसेच ईश्वरपूर येथे देण्यात आले.
१. कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात काही धर्मांध समाजकंटकांनी क्रूरकर्मा धर्मांध टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्यासमवेत मिरवणुकीचे आयोजन केले आहे. या संदर्भात सामाजिक माध्यमांद्वारे संदेश पाठवण्यात येत आहेत. तरी क्रूरकर्मा धर्मांध टिपू सुलतान याच्या जयंतीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, या मागणीचे पोलीस अधीक्षकांच्या नावे असलेले निवेदन हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आले. हे निवेदन पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी स्वीकारले.
या प्रसंगी या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, श्री. अमर जाधव, हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते यांसह शिवसेना, उद्धव ठाकरे गट, हिंदू एकता आंदोलन, हिंदु महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती यांसह हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२. ईश्वरपूर (जिल्हा सांगली) –येथे सकल हिंदु समाज, वारकरी संप्रदाय, बजरंग दल, तसेच विश्व हिंदु परिषद यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या प्रसंगी भाजप, शिवसेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, ईश्वरपूर व्यायाम मंडळ, भारतीय किसान संघ यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
३. सांगली शहर – येथे जिल्हाधिकारी राजा उदयनिधी यांना हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या प्रसंगी विष्णुपंत पाटील, नारायण हांडे, गणेश गायकवाड, प्रकाश भोसले, विजय वाघमारे यांसह अन्य उपस्थित होते.
ईश्वरपूर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन देतांना भाजपचे शहर सरचिटणीस श्री. प्रवीण परीट आणि श्री. अक्षय पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सरसेनापती श्री. अशोक विरकर, सर्वश्री अविनाश जाधव, मंदार चव्हाण, शेखर खांडेकर, पाटीदार समाजाचे सर्वश्री दीपक पटेल, सतीश पटेल, महेश पटेल, हिंदु जनजागृती समितीचे श्री. भरत जैन उपस्थित होते.
अन्य २ निवेदन देण्यात आली. त्या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाने श्री. अभिमन्यू पाटील, भारतीय किसान संघाचे श्री. अजित जाधव (अण्णा), शिवसेनेचे वाळवा तालुकाप्रमुख श्री. सागर मलगुंडे, वारकरी संघटनेचे ह.भ.प. दशरथ पाटील, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल वाळवेकर, बजरंग दलाचे सर्वश्री सचिन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सचिन जंगम, भाजपचे श्री. अर्जुन बाबर, ईश्वरपूर व्यायाम मंडळाचे श्री. मानसिंग पाटील, पुरोहित श्री. अनंत दीक्षित आदी उपस्थित होते.