चैतन्‍यमयी देवद (पनवेल) येथील सनातनचा आश्रम !

‘१३.८.२०२२ या दिवशी मला देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमाचे दर्शन घेण्‍याची संधी लाभली. त्‍या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर

१. परात्‍पर गुरु पांडे महाराज यांच्‍या खोलीचे दर्शन घेणे

खोलीतील परात्‍पर गुरु पांडे महाराज यांच्‍या छायाचित्रात पालट झाला आहे. त्‍यांचे छायाचित्र पिवळ्‍या रंगाचे झाले आहे. ‘त्‍यांच्‍या छायाचित्रातून पुष्‍कळ प्रमाणात चैतन्‍य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. खोलीत एक वेगळ्‍याच प्रकारची शांतता होती. ‘मला शिवतत्त्व मिळत आहे’, असे जाणवत होते.

२. ध्‍यानमंदिरातील देवतांची चित्रे आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांचे छायाचित्र  

अ. ध्‍यानमंदिरात गुरुपादुका आहेत. त्‍यांच्‍या डाव्‍या बाजूला पुरुष देवतांची चित्रे आहेत. ‘त्‍या देवता सगुण रूपात आहेत’, असे मला जाणवत होते. गुरुपादुकांच्‍या उजव्‍या बाजूला स्‍त्री देवतांची चित्रे आहेत. ‘त्‍या देवता निर्गुण रूपात आहेत’, असे मला जाणवत होते.

आ. ‘प.पू. भक्‍तराज महाराज यांचे छायाचित्र सजीव झाले आहे’, असे मला जाणवले. मला त्‍यांच्‍या छायाचित्राकडे पाहून आनंद जाणवत होता.

३. आनंदी आणि सेवारत असणारे वयस्‍कर साधक

सर्व वयस्‍कर साधक अत्‍यंत आनंदी आणि समाधानी दिसत होते. ते सेवा करत असतांना पाहून माझ्‍यातील उत्‍साहात वाढ झाली. ‘त्‍या साधकांप्रमाणे सेवा करावी’, असे मला वाटले.

४. संतांचा साधेपणा

संत साधकांच्‍या समवेत सेवा करतात. ‘संतांमधील चैतन्‍यामुळे साधकांना ऊर्जा मिळत आहे’, असे मला वाटले.

५. देवद आश्रमात अनेक ठिकाणी मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाप्रमाणे स्‍पंदने जाणवली. तेव्‍हा ‘गुरुदेव सर्वत्र आहेत. मला केवळ तसा भाव ठेवून त्‍यांना अनुभवायचे आहे’, असे मला वाटले.

६. कृतज्ञता

‘हे गुरुदेवा, आपल्‍याच कृपेने या जिवाला आश्रम पहाण्‍याची आणि शिकण्‍याची संधी लाभली’, त्‍याबद्दल आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्‍याणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.८.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक