१. मी ‘निर्विचार’ नामजप करत असतांना माझ्या मनातले सर्व विचार नाहीसे झाले. तेव्हा मला पुष्कळ हलके वाटले. ‘मी आकाशात तरंगत आहे’, असे मला जाणवले.
२. नामजप करतांना ‘मी उच्च लोकांमध्ये आहे’, असे वाटून मी एकदम महा, जन, तप आणि सत्य अशा लोकांत प्रवास करून आल्याचे मला जाणवले. त्या सर्व लोकांत पुष्कळ शांती आणि आनंद जाणवत होता.
– सौ. जान्हवी विभूते, कवळे, फोंडा, गोवा. (१९.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |