सद़्‍गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांच्‍या घरी गेल्‍यावर होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना जाणवलेली सूत्रे

‘वर्ष २०२२ मध्‍ये दत्तजयंतीच्‍या दुसर्‍या दिवशी मी सद़्‍गुरु कुवेलकरआजी यांच्‍या दर्शनासाठी गेले होते. तेव्‍हा मला जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.

सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी
होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

१. त्‍यांच्‍या खोलीत प्रवेश करतांना ‘मी एका पोकळीत प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले.

२. सद़्‍गुरु कुवेलकरआजी पलंगावर पहुडल्‍या होत्‍या. तेव्‍हा त्‍यांच्‍या देहाचा आकार पुष्‍कळ लहान जाणवत होता. ‘सद़्‍गुरु आजी देहात असूनही देहात नाहीत’, असे मला काही क्षण जाणवले.

३. सद़्‍गुरु आजींच्‍या खोलीची उंची आणि आकारमान प्रत्‍यक्षात आहे, त्‍यापेक्षा विशाल असल्‍याचे मला जाणवत होते.

४. त्‍यांच्‍या खोलीत पुष्‍कळ पांढरा प्रकाश जाणवत होता.

५. सद़्‍गुरु आजींनी माझी प्रेमाने विचारपूस केली. तेव्‍हा त्‍यांच्‍या बोलण्‍यातून प्रीती जाणवून त्‍यांचे शब्‍द अंतर्मनात जाऊन भावजागृती होत होती. त्‍या वेळी मला पुष्‍कळ आनंद जाणवत होता.

६. सद़्‍गुरु आजींचा प्रवास निर्गुणाकडे वेगाने होत असल्‍याचे मला जाणवले.’

 – होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, गोवा. (४.३.२०२३)     

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक