बेंगळुरू (कर्नाटक) – सध्या चालू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये न्यूझीलंडचे भारतीय वंशाचे खेळाडू रचिन रवींद्र हे चांगली फलंदाजी करत आहेत. त्यामुळे त्यांचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले आहे. रचिन यांच्या वडिलांचे मूळ बेंगळुरू येथील आहे. तेथे रचिन यांची आजी आणि आजोबा रहातात. रचिन त्यांना भेटण्यासाठी बेंगळुरू येथे आले असता त्यांच्या आजीने त्यांची दृष्ट काढल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. रचिन यांचे आजी आणि आजोबा शिक्षणतज्ञ आहेत.
सौजन्य गुडन्यूजटूडे
संपादकीय भूमिकाआता देशातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि अंनिस सारख्या संघटना रचिन यांच्या आजीला अंधश्रद्धाळू ठरवतील ! |