कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलॅनी जॉली यांचा साळसूदपणा
ओटावा (कॅनडा) – भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध सध्या वाईट टप्प्यातून जात आहेत. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलॅनी जॉली यांनी सांगितले की, त्या भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस् जयशंकर यांच्या संपर्कात असून दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जपानमधील टोकियो येथे होणार्या जी ७ बैठकीला उपस्थित रहाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलतांना जॉली यांनी वरील विधान केले.
त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताने कॅनडाच्या ४१ मुत्सद्दींना परत पाठवले; पण कॅनडा प्रत्युत्तर देणार नाही. (साळसूदपणाचा आव आणणार्या मेलिनी जॉली ! – संपादक) दोन्ही देश एकत्र येऊन यावर तोडगा काढू इच्छितात.
संपादकीय भूमिकासंबंध बिघडवण्याला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हेच कारणीभूत आहेत. भारतावर केलेल्या निराधार आरोपांवरून त्यांनी भारताची जाहीर क्षमा मागितल्यावरच संबंध सुधारू शकतात, हे आता भारताने कॅनडाला ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे ! |