संस्‍कारित वाणी हेच माणसाचे खरे भूषण !

केयुरा न विभूषयन्‍ति पुरुष हारा न चन्‍द्रोज्ज्वलाः
न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः ।

वाण्‍येका समलंकरोति पुरुषं या संस्‍कृता धार्यते
क्षीयन्‍ते खलु भूषणानि सततं वाग्‍भूषणं भूषणम् ॥

अर्थ : माणसाला बाजूबंद, चंद्रासमान हार, स्नान, उटणे, फूल किंवा सजवलेले केस भूषवत नाहीत. संस्‍कारित अशी वाणीच माणसाला भूषवते. अन्‍य भूषणे नाश पावतात. वाणी हे चिरकाल टिकणारे भूषण आहे.