कॅनडाच्या संसदेत आयोजित दिवाळी समारंभाच्या वेळी ॐ लिहिलेला भगवा ध्वज फडकावला !

कॅनडातील भारतीय वंशाचे हिंदु खासदार चंद्रशेखर आर्य यांनी केले आयोगन

खासदार चंद्रशेखर आर्य

ओटावा (कॅनडा) – कॅनडातील भारतीय वंशाचे हिंदु खासदार चंद्रशेखर आर्य यांनी येथील ‘पार्लियामेंट हिल’वर दिवाळीनिमित्त एका भव्य समारंभाचे आयोजन केले होते. संसदेत समारोह पार पडला, तर संसदेच्या बाहेर हिंदूंचे पवित्र चिन्ह असलेला ॐ लिहिलेला भगवा ध्वज फडकावण्यात आला, अशी माहिती स्वत: आर्य यांनी दिली.

सौजन्य शीलोंग टाइम्स  

मूळचे कर्नाटक येथील असलेले खासदार आर्य या वेळी म्हणाले की, ओटावा, ग्रेटर टोरंटो क्षेत्र आणि मॉन्ट्रियाल यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये अशा समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. याला भारतीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमांना संपूर्ण कॅनडातील ६७ हिंदु संघटनांचे समर्थन प्राप्त झाले होते. दिवाळी हा ‘हिंदु हेरिटेज मंथ’चा (हिंदु वारसा महिन्याचा) भाग असून यामध्ये हिरिरीने सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेणार्‍या कलाकारांचे धन्यवाद.