मागण्यांसाठी दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
मुंबई – सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी एस्.टी.च्या संपाची घोषणा केली होती; मात्र मंत्री उदय सामंत यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय झाला. मागण्यांच्या संदर्भात दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीतील निर्णयांची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.
LIVE | उद्योगमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद https://t.co/rOYmkvRxPu
— Max Maharashtra (@MaxMaharashtra) November 6, 2023
बैठकीतील निर्णय !
१. पुरुष आणि महिला यांच्यावर अन्याय होत असेल, तर ते संबंधित अधिकार्यांकडे दाद मागू शकतात, असे पत्रक काढण्यात येईल.
२. बोनस वाढला पाहिजे, यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेऊन जाहीर करतील.
३. २ सहस्र २०० नवीन बसगाड्या येणार आणि वर्ष २०२५-२०२६ या कालावधीत २ सहस्र ५०० बसगाड्या येतील.
४. येत्या ४ वर्षांत एस्.टी. मध्ये ९ सहस्र बसगाड्या येतील.
५. २ वर्षांत २ सहस्र ईव्ही गाड्या दाखल होतील.