‘जिहाद कसा लढला जातो ?’ याविषयीचे एक मार्मिक विश्लेषण

ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर

२० व्या आणि २१ व्या शतकात जगभर जो जिहाद चालू आहे, त्याची नेमकी व्याख्या ‘कुराणिक कन्सेप्ट ऑफ वॉर’ (कुराणातील युद्ध संकल्पना) या पुस्तकात पाकिस्तानी निवृत्त सैन्याधिकारी ब्रिगेडियर एस्.के. मलिक यांनी केली आहे. ‘जिहाद कसा लढला जातो ?’, याविषयी ते म्हणतात, ‘‘जिहाद शस्त्रांनी लढला जात नाही, तो शस्त्रांनी जिंकता येत नाही, तो हिंसा करून जिंकता येत नाही आणि रक्ताचे पाट वाहिले; म्हणून जिहाद यशस्वी होत नाही.’’ ‘जिहाद कसा जिंकला जातो ?’, हे सांगतांना ‘जिहादमधील सर्वांत प्रभावी धारदार शस्त्र कुठले आहे’, तेही ब्रिगेडियर मलिक यांनी सांगितले आहे. ते शस्त्र आहे, ‘आपल्या श्रद्धा भक्कम करणे, म्हणजे ज्या धर्मांधाला जिहाद करायचा आहे, त्याने त्याची धर्मश्रद्धा ही अतिशय कडवट, कट्टर आणि धारदार केली पाहिजे. स्वतःची श्रद्धा धारदार करतांना आपल्या शत्रूची किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्याची धर्मश्रद्धा ही ढासळून टाकणे, बोथट करणे आणि बधीर करून टाकणे. एकदा का आपल्या विरोधकांची धर्मश्रद्धा बधीर झाली की, तो लढूच शकत नाही. त्याचे लढण्याचे धाडसच खच्ची होऊन जाते.’ हे लक्षात घेण्यासारखे आहे.

– श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार