देवावर माझा विश्‍वास आहे; परंतु अंधश्रद्धेवर नाही ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

विजयनगर (कर्नाटक) – राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हंपी येथील विरूपाक्षमंदिरात जाऊन विशेष पूजा केली. या वेळी श्रीभुवनेश्‍वरी देवी मातेची पूजा केली. नंतर विद्द्यारण्य भारती सरस्वती स्वामीजी यांनी सिद्धरामय्या यांना रुद्राक्षाची माळ घातली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, अंधश्रद्धेवर माझा विश्‍वास नाही; परंतु देवावर माझा विश्‍वास आहे. समाजाचे भले होण्यावर माझा विश्‍वास आहे, वाईट होण्यावर नाही. प्रत्येकाची स्वतःची अशी श्रद्धा असते. समाजासाठी चांगली असेल, तर श्रद्धा ठेवूया, वाईट असेल, तर विश्‍वास ठेवायला नको.

संपादकीय भूमिका

  • नुसतेच ‘देवावर विश्‍वास आहे’, असे म्हणून उपयोग नाही, तर तो प्रत्यक्षात दिसलाही पाहिजे. देवावर श्रद्धा असणार्‍या हिंदूंसाठी कार्यही केले पाहिजे, त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत आणि देवावरील श्रद्धेत वाढ होण्यासाठी समाजाला साधना शिकवण्यासाठी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. असे केल्याने कथित अंधश्रद्धाही दूर होईल !