फोंडा, गोवा येथील श्री. अरविंद कुलकर्णी यांचे छायाचित्र पाहून काय वाटते ? ते अनुभवा आणि याविषयीचे उत्तर खाली वाचा.
‘श्री. अरविंद कुलकर्णी यांचे छायाचित्र पाहून काय वाटते ?’ या सूक्ष्मातील प्रयोगाचे उत्तर
६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अरविंद कुलकर्णी यांचे छायाचित्र पाहून त्यांची जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !
१. देहाच्या संदर्भात जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये
अ. ‘श्री. कुलकर्णी यांच्या चेहर्यावर तेज जाणवते. बाह्यतः ते फार साधना करतांना दिसत नसले, तरी त्यांची आंतरिक साधना चांगली चालू आहे. त्यामुळे हे तेज जाणवते.
आ. त्यांच्या चेहर्यावर काही प्रमाणात गुलाबी छटा जाणवते. त्यांच्यातील प्रीतीचे हे दर्शक आहे.
इ. त्यांची दृष्टी शून्यात असल्यासारखी जाणवते. त्यांचा प्रवास शीघ्रतेने निर्गुणाकडे होत असल्याचे हे प्रतीक आहे.
२. मनाच्या संदर्भात जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये
अ. ते ‘सर्वांमध्ये असूनही सर्वांमध्ये नाहीत’, असे जाणवते, म्हणजेच ‘विरक्त आहेत’, असे जाणवते.
३. अन्य आध्यात्मिक वैशिष्ट्ये
अ. त्यांच्याकडून सात्त्विक शक्ती प्रक्षेपित होत असल्यामुळे त्यांचे छायाचित्र पहातांना मला काही प्रमाणात आध्यात्मिक लाभ झाला.
आ. त्यांचे छायाचित्र पाहून माझे मन निर्विचार आणि शांत झाले.
इ. त्यांच्या छायाचित्रातून प्रक्षेपित होणार्या शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांचे जाणवलेले प्रमाण
टीप – भाव : व्यक्त स्वरूपातील ३० टक्के असून, अव्यक्त स्वरूपातील ७० टक्के आहे.’
– पू. संदीप आळशी (१५.५.२०२३)
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. |