आश्विन मासातील तिथींचे महत्त्व !

चातुर्मासात येणारा आश्विन मास हा ‘देवतांचे सण आणि उत्‍सव यांचा मास’ म्‍हटला जातो. या मासात येणार्‍या तिथींना विविध देवतांचे पूजन करण्‍यासह वेगवेगळे सण साजरे केले जातात. अशा विविध तिथींची माहिती येथे देत आहोत.

१. शुद्ध प्रतिपदा : घटस्‍थापना

२. पंचमी : ललितापंचमी

३. षष्‍ठी  : सरस्‍वती आवाहन (मूळ नक्षत्र)

४. सप्‍तमी : महालक्ष्मीपूजन आणि घागर फुंकणे

५. अष्‍टमी : दुर्गाष्‍टमी

६. नवमी : नवरात्र उत्‍थापन आणि गायत्रीदेवीचा उत्‍सव.

७. दशमी : विजयादशमी आणि नवरात्र समाप्‍ती

८. एकादशी : पाशांकुशा एकादशी

९.  पौर्णिमा : कोजागरी आणि वाल्‍मीकि जयंती.

१०. कृष्‍ण पक्ष चतुर्थी : संकष्‍टी चतुर्थी

११. कृष्‍ण पक्ष अष्‍टमी : कालाष्‍टमी

१२. कृष्‍ण पक्ष एकादशी : रमा एकादशी

१३. कृष्‍ण पक्ष द्वादशी : वसुबारस

१४. कृष्‍ण पक्ष त्रयोदशी : धनत्रयोदशी

१५. कृष्‍ण पक्ष चतुर्दशी : नरक चतुर्दशी

१६. अमावास्‍या : दीपावली लक्ष्मीपूजन आणि विक्रम संवत् समाप्‍ती.

– ज्‍योतिषी श्री. ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी), पुणे

(साभार : ‘धार्मिक’, दीपावली विशेषांक २०१७)