विविध नेत्यांनी केलेल्या ‘हेट स्पीच’च्या विरोधात हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील पोलीस ठाण्यात तक्रार !

हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करतांना १. श्री. नितीन काकडे, तसेच हिंदुत्वनिष्ठ

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – उदयनिधी स्टॅलीन, ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडू येथील द्रमुकचे खासदार ए. राजा, पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात (‘हेट स्पीच’च्या) हुपरी पोलीस ठाण्यात धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. ही तक्रार पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी स्वीकारली. या प्रसंगी सर्वश्री सचिन माळी, महादेव आढावकर, ऋषिकेश साळी, सौरभ खोत, सुनील खोत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर उपस्थित होते.