मुंब्रा रेल्वे स्थानकावर पायदळी तुडवला जाईल, अशा पद्धतीने लावले इस्रायलच्या झेंड्याचे स्टिकर !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंब्रा – येथील रेल्वे स्थानकात इस्रायलचा झेंडा स्टिकरच्या माध्यमातून एस्केलेटरच्या (सरकत्या जिन्याच्या) जवळ चिकटवण्यात आला आहे. तो अशा ठिकाणी चिकटवला आहे की, नागरिकांचे पाय नकळतपणे त्या झेंड्यावर पडतील. हमास-इस्रायल यांच्यातील युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर हा प्रकार केला असल्याची चर्चा आहे. हा झेंडा कुणी लावला, ते ठाऊक नाही. इस्रायलच्या निषेधार्थ त्यांचा अशा प्रकारे झेंडा लावल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संपादकीय भूमिका

  • मुंब्यासारख्या मुसलमानबहुल ठिकाणी याहून वेगळे काय घडणार ?