सुनेचा विनयभंग करणार्‍या सासर्‍यांवर गुन्‍हा नोंद !

नात्‍याला काळीमा फासणारी घटना !

डोंबिवली – येथील एका विवाहितेचा लैंगिक छळ आणि विनयभंग केल्‍याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्‍यात सासर्‍याविरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. गेल्‍या ६ वर्षांपासून हा प्रकार चालू होता. पीडित महिलेचे मार्च २०१७ मध्‍ये लग्‍न झाले होते. तेव्‍हापासून सासरे तिचा लैंगिक छळ, विनयभंग करत होते.