सरसंघचालकांच्या भाषणावर होणार ऊहापोह !
नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत भूज (गुजरात) येथे होणार आहे. त्यात २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यासह प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या दसरा उत्सवाच्या भाषणातील सूत्रांच्या कार्यवाहीवर चर्चा होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
या बैठकीत संघाच्या रचनेनुसार स्थापन झालेल्या एकूण ४५ प्रांतांतील प्रांत संघचालक, कार्यवाह, प्रांत प्रचारक आणि त्यांचे सहकारी संघचालक, सहप्रचारक अन् सह-प्रांत प्रचारक सहभागी होणार आहेत. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे आणि अखिल भारतीय अधिकारी यांच्यासह कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित रहाणार आहेत.