हांडेवाडी (पुणे) येथे उभारणार प्रभु श्रीरामाचा पुतळा !

पुणे – हांडेवाडी रस्‍त्‍यावरील श्रीराम चौकामध्‍ये महापालिकेच्‍या वतीने प्रभु श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. या प्रस्‍तावास महापालिकेच्‍या मुख्‍य सभेत संमती देण्‍यात आली. महापालिकेच्‍या वतीने चौकांमध्‍ये शिल्‍प, पुतळा उभारण्‍यासह सुशोभीकरणाचे निर्णय घेतले जातात.