साधनेच्या प्रवासात आपली दृष्टी सदैव गुरुचरणांवर हवी !

कु. मृण्मयी गांधी

‘१७.४.२०२३ या दिवशी मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीत सेवेसाठी गेले होते. मी त्यांच्या चरणांकडे पहात होते. तेव्हा माझ्या मनात पुढील विचार आले, ‘या चरणांवरून दृष्टी हटत नाही.’ त्या वेळी मला महामार्गावर वळणा-वळणावर लावलेल्या फलकांची आठवण झाली. ‘महामार्गावर फलक लावलेला असतो, ‘नजर हटी दुर्घटना घटी !’ त्याचप्रमाणे ‘गुरुचरणांवरून दृष्टी हटली, तर आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या खोल दरीत कधी पडू’, हे आपल्याला कळणारही नाही. जसे वाहनचालकाचे संपूर्ण लक्ष मार्गाकडे असते, तसे साधनेच्या प्रवासात आपली दृष्टी कायम गुरुचरणांवर हवी. गुरुचरणांवरून लक्ष विचलित व्हायला लागले की समजावे, अपघाती वळण आले आहे आणि सावध व्हावे.’

नंतर मला पुढील ओळी सुचल्या.

सूक्ष्मरूपे तू असशी जवळी श्रीसत्शक्ति माते ।
परि स्थूलरूपे तुझी उणीव आम्हा भासते ॥

भगवंताने मला हे विचार दिले, त्याबद्दल मी त्याच्या चरणी आणि ज्यांच्या चरण कमलांवरून दृष्टी हटू शकणार नाही, अशा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. मृण्मयी गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.४.२०२३)