‘मी वैयक्तिक अडचणींमुळे काही मास घरी होते. तेव्हा घरातील काही अडचणी माझ्या लक्षात आल्या. काही प्रसंग घडल्यावर माझा त्यांमध्ये पुष्कळ वेळ जायचा, तसेच मला ताण यायचा. ‘आपल्याच बाबतीत असे का घडते ?’, असा विचार येऊन मी निराश व्हायचे. तेव्हा आई मला योग्य दृष्टीकोन देऊन स्थिर रहायला शिकवायची. मी आश्रमात असतांना मला अशा प्रकारचे प्रसंग कळले, तर त्यामध्ये माझा अल्प वेळ जायचा आणि तेवढ्यापुरता ताण यायचा. आश्रमातील चैतन्यामुळे मला नकारात्मक विचारांतून लवकर बाहेर पडता यायचे. याविषयी आईला सांगितल्यावर ती मला म्हणाली, ‘‘यासाठीच मी तुला घरी बोलवत नाही. आश्रमातच रहायला सांगते. मायेतील गोष्टींत तुझा वेळ वाया जायला नको; म्हणून तू आश्रमात असलेलीच बरी !’’ साधनेची ओढ आणि आश्रमातील चैतन्याचे महत्त्व जाणणारी आई मला दिल्याबद्दल गुरुमाउलींच्या चरणी कृतज्ञता वाटते.’
– कु. मयुरी आगावणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.८.२०२३)