१. मनाचे जे स्पंदनरहित रूप तेच परमपद.
२. महाप्रलयानंतर जे शुद्धतत्त्व उरते, तोच सर्व पदार्थांचा भाव आहे, तेच परमात्मा स्वरूप आहे.
३. सामान्यतः हे जग दिसते. वास्तविक ते नाहीच. द्वैत नाहीच; कारण त्याचा कुणी कर्ता नाही. जग निर्माण करण्यास लागणारी सामुग्री नाही, आदि आणि अंत नाही; म्हणून मध्यही नाही. म्हणून जग नाहीच. जगद्रूप भासते, ते परमात्म स्वरूपातच आहे.
४. सर्व जग परमात्मा स्वरूपात, म्हणजे एका शांत स्वरूपात स्थिर आहे.
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०२३)