मुंबई, नागपूरसह ३ शहरांतून जप्त केले ११ कोटी रुपयांचे ३२ किलो सोने !

प्रतिकात्मक चित्र

नागपूर – महसूल गुप्तचर संचालनालयाने (‘डी.आर्.आय.’ने) देशात ३ शहरांत कारवाई करत ३२ किलो सोन्यासह ११ तस्करांना अटक केली. या सोन्याची किंमत ११ कोटी रुपयांहून अधिक आहे. हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस रेल्वेमार्गे आरोपी तस्करी करत असल्याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मुंबई येथे ५, वाराणसी २ आणि नागपूर येथून ४ जणांना अटक करण्यात आली. राहुल (वय ३६ वर्षे) आणि बाळुराम (वय ४१ वर्षे) अशी नागपूर येथे पकडलेल्या २ आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडील २ पिशव्यांमध्ये अंदाजे ८ किलो ५ ग्रॅम विदेशी चिन्हांकित सोन्याची बिस्किटे होती.

  • महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई !     
  • ११ तस्करांना अटक !