पुणे – आस्थापनाचे संचालक असल्याचे भ्रमणभाष आणि ‘व्हॉट्सॲप’वर संदेश पाठवले. त्या माध्यमातून कोथरूड येथील एका बांधकाम व्यावसायिकाची ६६ लाख ४१ सहस्र ५२२ रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बिहार राज्यातील बेलाल अन्सारी आणि कामरान अन्सारी यांना अटक केली आहे. यापूर्वी बिशाल मांझी याला अटक केली आहे. ही कारवाई पुणे सायबर पोलिसांनी केली. अटक केलेल्या आरोपींकडून ८ भ्रमणभाष, ३६ सिम कार्ड, १९ ए.टी.एम्. कार्ड, २ धनादेश पुस्तके (चेकबुक), तसेच गावठी कट्टा आणि ६ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती आर्थिक आणि सायबर शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.