पॅरिस (फ्रान्स) – सध्या फ्रान्समध्ये ढेकणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिक भयभीत आहेत. पॅरिस आणि मार्सेल या शहरांमध्ये याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पुढील वर्षी पॅरिसमध्ये ऑलिंपिक स्पर्धा होणार असल्याने फ्रान्स सरकारला त्याची चिंता वाटू लागली आहे.
हॉटेल्स आणि इतर पर्यटनस्थळे, चित्रपटगृह, सभागृह रेल्वे, बस आणि घरे येथे ढेकूण आढळत आहेत. उपमहापौर इमॅन्युएल ग्रेगरी यांनी पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांना पत्र लिहून राष्ट्रीय कृती योजना सिद्ध करण्याची मागणी केली आहे.