साधिकेला मराठी भाषा न येणे; परंतु रामनाथी आश्रमात असतांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्‍यावर एका आठवड्यात मराठी भाषा शिकता येणे

‘गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) कृपेने १६ ते २२.६.२०२३ या कालावधीत मला ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या वेळी गृहव्‍यवस्‍थापनाशी संबंधित सेवा करण्‍याची संधी मिळाली.

कु. अर्चना कुरुडेकर

मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर पहिल्‍याच दिवशी मला पुष्‍कळ आनंद झाला. मला हिंदी आणि मराठी या भाषा येत नाहीत. मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘गुरुदेव, गोव्‍यातून परत जाईपर्यंत मला हिंदी किंवा मराठी भाषा शिकवा.’ गुरुदेवांनी मला साधकांच्‍या माध्‍यमातून पुष्‍कळ साहाय्‍य केले. मी महाराष्‍ट्रात ३ वर्षे राहूनही मला मराठी भाषा येत नव्‍हती; परंतु रामनाथी आश्रमात राहिल्‍यावर मी एका आठवड्यात मराठी शिकले. त्‍याबद्दल मी गुरुचरणी भावपूर्ण कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– कु. अर्चना कुरुडेकर, दावणगेरे, कर्नाटक. (४.७.२०२३)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक