साधकांनो, पितरांच्‍या श्राद्धविधीविषयी विचारपूर्वक बोला !

सुश्री (कु.) दीपाली होनप

‘सध्‍या पितृपक्ष चालू असल्‍याने बर्‍याच साधकांच्‍या घरी महालय श्राद्ध करण्‍यात येत आहे, तसेच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातही श्राद्धविधी करण्‍यात येत आहेत. श्राद्धाविषयी बोलतांना काही साधक म्‍हणतात, ‘‘आज आमचे श्राद्ध आहे.’’ एकदा एक साधिका तर सहज बोलून गेली, ‘‘आज माझे श्राद्ध आहे.’’ या वाक्‍यांचा अर्थ समजून घेतल्‍यास ‘तो त्रासदायक आहे’, हे लक्षात येईल.

शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध आणि त्‍याच्‍याशी संबंधित शक्‍ती एकत्रित असतात. त्‍यामुळे सहज बोलतांनाही अनावधानाने एखादा शब्‍द अयोग्‍य उच्‍चारला गेला, तरी त्‍यातून त्रासदायक स्‍पंदने प्रक्षेपित होतात आणि त्‍यांचा त्रासदायक परिणाम बोलणारी व्‍यक्‍ती आणि ते बोलणे ऐकणारी व्‍यक्‍ती यांच्‍यावर होत असतो.

श्राद्धाविषयी बोलतांना ‘आज आमच्‍या पितरांचे श्राद्ध आहे’, असे अर्थपूर्ण बोलल्‍यास त्‍यातून योग्‍य स्‍पंदने प्रक्षेपित होतील आणि त्‍यांचा कुणालाही त्रास होणार नाही.’

– सुश्री (कु.) दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१०.२०२३)