चारित्र्य र्‍हास

‘चारित्र्य र्‍हास’ ही आज सर्वांत महत्त्वाची समस्या आहे. तिचे पडसाद कुटुंबातील नाती, व्यवसाय क्षेत्रे, समाजकार्य, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध या सर्व स्तरांवर उमटत आहेत. वस्तूतः भारत ही तत्त्वचिंतकांची तीर्थभूमी आहे, धर्म साधनांची प्रयोगभूमी आहे. मानवी संस्कृतीचे कैलास लेणे आहे. ऋषी आणि संत यांचे उदात्त चरित्र आणि चारित्र्य यांचा परममंगल वारसा देशाला आहे. असे असूनही सर्व क्षेत्रांत तत्त्वनिष्ठेचा अभाव आणि अधर्माचरणवृत्ती यांचे प्राबल्य माजले आहे. या सार्‍या प्रश्नांच्या मूलग्राही चिंतनातून आपले सांस्कृतिक स्वत्व आणि अस्मिता यांचा पुनर्शाेध आवश्यक ठरतो.

– डॉ. ज.वा. जोशी, धर्म आणि तत्वज्ञान सम्मेलन.