युक्रेनच्या तरुणीने युक्रेन-रशिया युद्धात मृत्य झालेल्यांसाठी गया येथे केले पिंडदान !

पिंडदान करताना युक्रेनची तरुणी उलिया जिटोमरस स्काई

गया  (बिहार) – येथे युक्रेनमधून आलेल्या एका तरुणीने युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धात ठार झालेले दोन्ही देशांचे सैनिक आणि नागरिक यांच्यासाठी पिंडदान केले. उलिया जिटोमरस स्काई असे या तरुणीचे नाव आहे. स्काई यांनी येथील फल्गुनदीच्या तटावर असलेल्या देवघाट येथे पिंडदान केले.

सौजन्य: News18 Bihar Jharkhand

स्काई यांच्याशी पत्रकारांनी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितले की, या युद्धात माझ्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. यासह या युद्धात हुतात्मा झालेले सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्या आत्म्यांना शांतता मिळावी, यासाठी मी येथे पिंडदान करण्यासाठी आले आहे. जगात जर कुठे मोक्षभूमी असेल, तर ती गया येथेच आहे. मी दुसर्‍यांदा गया येथे पिंडदान करत आहे. मागच्या वेळी मी जेव्हा येथे आले होते, तेव्हा मला शांतता लाभली होती. आम्ही प्रार्थना करतो की, दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण व्हावी.

संपादकीय भूमिका

  • श्राद्धविधीवर शंका उपस्थित करून त्यावर टीका करणारे भारतातीय पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना चपराक !
  • विज्ञानवादी पाश्‍चात्त्यांना जेव्हा हिंदु धर्मातील विधींविषयी विश्‍वास निर्माण होईल आणि ते या संदर्भात कृती करतील, तेव्हा भारतातील पुरो(अधो)गामी त्यांचे अनुकरण करतील !