|
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात धर्मांध मुसलमान हिंदूंवर सातत्याने आक्रमणे करत आहेत. आता कुरीग्राम जिल्ह्यातील नागेश्वरी येथील राधापद रॉय नावाच्या हिंदु साधूला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. ही माहिती केवळ तेथील अल्पसंख्यांक समाजावरील अन्याय जगासमोर आणणार्या ‘पाकिस्तान अनटोल्ड’ अथवा ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ यांसारख्या ट्विटर खात्यांवरूनच नव्हे, तर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही ट्वीट करून दिली आहे. नसरीन यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, रफिकुल इस्लाम आणि कादुर अली यांनी ८० वर्षीय साधू राधापद रॉय यांना मारहाण केली. ट्वीटसमवेत त्यांनी घायाळ अवस्थेतील रॉय यांची छायाचित्रेही जोडली आहेत.
80-year-old balladist Radhapada Roy from Nageswari, Kurigram, Bangladesh was beaten up by Rafiqul Islam and Kadur Ali. pic.twitter.com/jClyALCI9X
— taslima nasreen (@taslimanasreen) October 3, 2023
पोराहाती गावात श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड
बांगलादेशातील अन्य एका घटनेमध्ये झिनायदा जिल्ह्यातील पोराहाती गावात श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. ‘हिंदु व्हॉईस’ने त्याच्या ट्विटर खात्यावरून याविषयीची माहिती देतांना सांगितले की, इस्लामी बांगलादेशात श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड सातत्याने होत आहे. फरीदपूर, गोपालगंज आणि नाराइल या जिल्ह्यांतील घटनांनंतर आता झिनायदा या जिल्ह्यात दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. ‘हे स्पष्ट आहे की, बांगलादेश त्याच्या हिंदु अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यास अपयशी ठरले आहे’, असेही या ट्वीटमध्ये पुढे सांगण्यात आले आहे.
Durga Murti breaking continues in Islamic #Bangladesh. After Faridpur, Gopalganj and Narail district, news of Durga Murti breaking coming in from Porahati village under Porahati union of #Jhinaidah district.
It is clear that Bangladesh has failed to secure its Hindu minorities. pic.twitter.com/laPyYFba3R— Hindu Voice (@HinduVoice_in) October 3, 2023
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
संपादकीय भूमिकापाकिस्तान असो अथवा बांगलादेश, तेथील हिंदूंना आता कुणीच वाली उरलेला नाही. भारत सरकारही या जिहादी देशांकडे अशा घटनांवरून साधा निषेधही नोंदवत नाही. आता भारतभरातील हिंदूंनीच त्यांच्या शेजारी देशांतील बांधवांच्या सुरक्षिततेची हमी मिळण्यासाठी भारत सरकारवर दबाव आणून त्या माध्यमातून पाक आणि बांगलादेश यांना हिंदूंचे रक्षण करण्यास बाध्य केले पाहिजे ! |