हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
सच्चिदानंद परब्रह्म तुम्ही शाश्वत निराकार ।
सर्वव्यापी तुम्ही चैतन्यरूपी शरणागतांस ॥ १ ॥
ज्ञानरूपा, करुणानिधी हे विष्णुरूपा ।
तव कृपे वैकुंठधाम येई आकारा, लाभे निर्मळता चराचरा ॥ २ ॥
संतशिरोमणी, भक्तवत्सला, हे दयाघना ।
तव दर्शने पूर्ण होती सर्व मनोकामना ॥ ३ ॥
आपत्काली नामसाधना, सेवा, त्याग करू ।
शुद्धीयज्ञी स्वभावदोष अन् अहंचे समर्पणही करू ॥ ४ ॥
राष्ट्रगुरु तुम्ही, ज्ञानगुरु तुम्ही, जगदोद्धारक हो ।
मोक्षगुरु तुम्ही सर्व साधका संजीवनी द्या हो ॥ ५ ॥
जन्मोत्सव तव आहे, म्हणूनी भरला मनी उल्हास ।
ओवाळू आरती प्राणांची हीच एक आस ॥ ६ ॥
हे हिंदु राष्ट्र प्रेरका, धर्मरक्षका, वंदन तुम्हा ।
करतसे विश्वगुरु होण्या (टीप), करतसे विश्वगुरु होण्या ॥ ७ ॥
टीप – करतसे विश्वगुरु होण्या, म्हणजे ‘भारत देश विश्वगुरु होण्यासाठी हे गुरुदेवा, आम्ही तुम्हाला वंदन करतो’, अशा अर्थाने शेवटच्या दोन ओळी आहेत.
– श्री. गोविंद लोलयेकर (वय ६९ वर्षे), काणकोण, गोवा. (७.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |