प्रत्‍येक हिंदु कुटुंबातील महिला शिक्षणासह धर्मशिक्षित व्‍हायला हवी ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथे सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाच्‍या वतीने व्‍याख्‍यानाचे आयोजन

व्‍याख्‍यानात बोलतांना श्री. सुनील घनवट आणि उपस्‍थित महिला

सोलापूर – सध्‍या लव्‍ह जिहादची भयावहता लक्षात घेऊन प्रत्‍येक हिंदु कुटुंबातील महिला शिक्षणासमवेत धर्मशिक्षित व्‍हायला हवी, असे उद़्‍गार हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. येथील सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज, सोलापूर यांच्‍या वतीने ‘लव्‍ह जिहाद आणि हलाल जिहाद यांचे दुष्‍परिणाम अन् त्‍यावरील उपाय’ या विषयावर आयोजित व्‍याख्‍यानात ते बोलत होते. या वेळी समितीचे श्री. राजन बुणगे यांनीही मार्गदर्शन केले. या व्‍याख्‍यानाचे आयोजन श्री. सुभाष गवळी आणि सोलापूर शहराचे सांस्‍कृतिक प्रमुख श्री. ज्ञानेश्‍वर गवळी यांनी केले होते. या व्‍याख्‍यानाचा लाभ क्षत्रिय समाजातील अनेक महिलांनी करून घेतला.

क्षणचित्रे

१. आयोजकांनी सर्व महिलांना ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट दिला.

२. या वेळी उपस्‍थित महिलांनी हलालविरहित उत्‍पादने खरेदी करण्‍याचा, तसेच यंदाच्‍या वर्षी ‘हलालमुक्‍त गणेशोत्‍सव’ साजरा करण्‍याचा निर्धार केला.

३. श्री. सुभाष गवळी यांनी ‘योगा क्‍लास’मध्‍ये हा विषय ऐकल्‍यानंतर ते प्रभावित झाले. हा विषय क्षत्रिय समाजातील महिलांपर्यंतही जायला हवा, या विचाराने त्‍यांनी २ दिवसांत या व्‍याख्‍यानाचे आयोजन केले.